Breaking News

वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश देत फोक्सवॅगनची शहरातून कार रॅली


अहमदनगर - आपल्यासह इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीच्या नियम पाळण्याचा संदेश देत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत फोक्सवॅगन शोरुमच्या वतीने शहरातून कार रॅली काढण्यात आली. जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीचा प्रारंभ झाला. यावेळी शहर वाहतुक शाखेचे पो.नि. अविनाश मोरे, सेल्स हेड शशीकांत मोहिते, सी.आर. हेड तेजल शिंदे, पीरमोहंमद मुलानी, इरफान शेख, नम्रता दोंता, संदिप थोरात, विक्टर क्रॉस, वैशाली, रोशन फरतरे, अभिषेक किर्ती आदि उपस्थित होते.

जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले की, स्वत:च्या सुरक्षिततेसह इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. अपघातात एखादा कर्ता पुरुष दगावल्यास तो संसार उघड्यावर येतो. कुटुंबीयांच्या जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावे. वाहतुकीचे नियम सुरक्षिततेसाठी असून, निष्काळजीपणाने वाहन चालविल्यास अनेकांना जीव गमवावा लागत आहे. शशीकांत मोहिते यांनी फोक्सवॅगनने सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिले असून, समाजात वाहतुक नियमांबद्दल जागृकता निर्माण होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे स्पष्ट केले.

आपल्यासह इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश देत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालया पासून प्रारंभ झालेली ही कार रॅली स्टेट बँक चौक, जुने बस स्थानक, स्वास्तिक चौक, दिल्ली गेट, पत्रकार चौक, गुलमोहर रोड, पाइपलाईन रोड, सावेडी नाका या प्रमुख रस्त्यावरुन मार्गक्रमण करुन नगर-मनमाड रोडवरील फोक्सवॅगन शोरुम येथे समारोप झाला. या उपक्रमासाठी फोक्सवॅगन शोरुमचे संचालक रितेश नय्यर यांनी पुढाकार घेतला होता