Breaking News

कामगारांनी श्रमाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासली -स्वप्निल शिंदे


अहमदनगर- मनुष्याने मनुष्यासाठी उपयोगी येणे हेच माणुसकीचे लक्षण आहे. कामगारांनी श्रमाबरोबर सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे. आपल्या कष्टाच्या पैश्यातून वंचित घटकाला केलेली मदत प्रेरणादायी असून, मदत किती मोठी? यापेक्षा भावना मोठी आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने कुष्ठधाम येथे साजरा केलेला कामगार दिनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नगरसेवक स्वप्निल शिंदे यांनी केले
.
एमआयडीसी येथील राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने कुष्ठधाम येथील वृध्दांसमवेत कामगार दिन साजरा केला. नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्या हस्ते यावेळी कुष्ठधाम येथे फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी युनियनचे अध्यक्ष सचिन काळे, रवी वाकळे, सुरज विधाते, शाहू वडागळे, किरण वाकळे, किरण शिंदे, अमोल बळे, राहुल बळे, प्रकाश वाटमोडे, अनुराग पडोळे, संतोष भिंगारदिवे, दिपक घोडेकर, किरण गुंजाळ, लिडर बॉडीचे राजू दोरगे, निलेश सुडके, राहुल जगधने, भास्कर वाघ, बाबासाहेब साठे, संतोष लांडे आदिंसह एक्साईड इंडस्ट्रीजचे कामगार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन काळे यांनी युनियनच्या वतीने कामगार व समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची माहिती देवून, उपस्थित कामगारांना शुभेच्छा दिल्या.