‘प्रवरा’च्या अभ्यासक्रमांना मान्यता
प्रवरानगर : औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील अभ्यासक्रमांवर नियंत्रण ठेवणाऱ्या नवीदिल्लीच्या फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेने प्रवरा महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्रासक्रमाच्या तपासणीमध्ये तीनही अभ्यासक्रमांना कायमस्वरूपी १५ प्रवेश क्षमतेची मान्यता दिली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ यांनी दिली. यामध्ये फार्माकोग्नोसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, आणि फार्मास्युटिकल क्वालिटी अशुरन्स या तीन अभयसक्रमांचा समावेश आहे. ही मान्यता देतांना अनुभवी शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा प्रामुख्याने विचार केला गेला. सदर अभ्यासक्रमांना या पूर्वीच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवीदिल्ली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळालेली आहे.