Breaking News

बोगस डॉक्टर विरोधात कारवाईचे जिल्हा शल्यचिकित्सकांने दिले आदेश


जामखेड/प्रतिनिधी /- तालुक्यातील दिघोळ येथे तापसकूमार विश्वास नामक व्यक्ती मागील अनेक वर्षांपासून बोगसरित्या वैद्यकीय काम करत होता. या तोतया डाॅक्टरवर कारवाई करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली. याबाबत दिघोळ येथील रहिवासी हनुमंत कोचाळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर तब्बल सहा महिन्यानंतर शल्यचिकित्सक यांनी दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. 
तापसकूमार विश्वास हा तोतया डाॅक्टर बनून अनेक रुग्णांच्या जीवनाशी खेळत आहे . असे असताना देखील संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले . या तोतया डॉक्टराने केलेल्या उपचारामुळे लोकांना अनेक गंभीर आजार जडले आहेत. सदर व्यक्ती बद्दल हनूमंत ईश्वर कोचाळे( रा.दिघोळ) यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी तालूका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या कडे लेखी तक्रार देऊन सात महिने झाले तरी कारवाई केली गेली नाही. असे कोचाळे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. सदरील तोतया व्यक्ती अनेक वर्षांपासून स्वतः जवळ औषधे बाळगून त्याच औषधाच्या आधारे लोकांचा उपचार करत आहे. तो गर्भ राहिलेल्या स्त्रियांचे गर्भपात देखील करतो. गर्भविरोधी औषध देतो. स्टेराँईड सारखे औषधी तर सर्रास दिली जातात. त्यामुळे अनेक ग्रामस्थांना किडनी निकामी होणे, अचानक रक्तदाब कमी होणे- वाढणे, लिव्हर खराब होणे, आंतर इंद्रियांना वेगवेगळे आजार उद्भवण्याचे प्रकार गावात होत आहेत. विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या या इसमावर स्थानिक लेखी तक्रार करून देखील कोणतीही ठोस कारवाई न करता स्थानिक पातळीवर सहकार्य मिळत आहे. त्यामूळे त्याची तक्रार वरिष्ठांकडे करून सात महिने झाले. स्थानिक पोलीस त्या इसमाच्या अनुपस्थितीत दोन दिवसांपूर्वी गावात जाऊन थातूरमातूर चौकशी केली व तक्रारदारालाच पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. तसेच काही कागदावर सह्या करण्यास सांगितले. तसेच दोन वेळा जाऊनही पोलीसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही की, त्यांना हा तोतया डॉक्टर सापडलाही नाही. मात्र हा व्यक्ती गावाच्या भोवतीच फिरत असून गावकर्‍यांनी त्याला एकदा चोप देखील दिला आहे. जर हा तोतया व्यक्ती गावकर्‍यांना भेटतो. तर पोलीसांना का नाही. असा सवाल गावकरी उपस्थित करत आहेत. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी काय कारवाई करतात. याकडेही ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. उलटा चोर कोतवाल को डांटे असा पोलिसांचा प्रकार नेहमीच चालू आहे