Breaking News

डीएसकेची मालमत्ता जप्तीचे आदेश

पुणे : ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या रकमा विहित मुदतीमध्ये परत करण्यास कसूर केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना शासनाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 124 ठिकाणी असलेल्या जमिनी, विविध कंपनीच्या नावे आणि वैयक्तिक अशी एकूण 276 बँकांमध्ये असलेले खाते आणि 46 आलिशान चारचाकी अणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. डीएसके दाम्पत्याने अनेक ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपूर्तीनंतर परत केल्या नाहीत, अशा तक्रारी बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे डीएसके यांच्याविरुध्द शिवाजीनगर, कोल्हापूर, मुंबई येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियम 1999 नुसारही गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे शासनाने यापूर्वी डीएसकेंच्या मालमत्ता शोधण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने मालमत्ता शोधून त्यांची यादी शासनाकडे पाठविली होती. त्यामुळे शासनाने डीएसके यांच्या मालमत्ता जप्तीची अधिसूचना प्रसिध्द केली आहे. ही अधिसूचना गृह विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.
124 ठिकाणी असलेल्या जमिनी, विविध कंपनीच्या नावे आणि वैयक्तिक अशी एकूण 276 बँकांमध्ये असलेले खाते आणि 46 आलिशान चारचाकी अणि दुचाकी वाहनांचा समावेश