Breaking News

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीकडून जेलभरो आंदोलन

संगमनेर/प्रतिनिधी। शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीकडून सोमवारी {दि. १४} जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात सुकाणू समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माहिती देण्यात आली. सरसकट कर्जमाफीची घोषणा करूनही सरकारने प्रत्यक्षात कर्जमुक्तीऐवजी कर्ज वसुली मोहीम सुरु केली आहे. कपाशीवरील बोन्डआळीग्रस्त शेतकरी, गारपीटग्रस्त शेतकरी, भूसंपादनग्रस्त शेतकरी, गोवंशहत्याबंदीमुळे भाकड पशुधनाने त्रस्त शेतकरी, आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी न केल्याने त्रस्त शेतकरी आणि दूध धंद्यात मोडून पडलेला शेतकरी अशा विविध मुद्यांवर हे आंदोलन होणार आहे.