Breaking News

टोळीवर ग्रामीण पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई


सोलापूर, दि. 12, मार्च - सोड्डीगावात दरोडा टाकताना दोघांचा खून, मोहोळ येथे पोलिसांवर हल्ला तर एका नागरिकाचा खून करून पळून गेलेल्या टोळीवर ग्रामीण पोलिसांनी मोक्का अंतर्गत क ारवाई केली. छग्या गंगाराम शिंदे, त्याचा साथीदार वैजीनाथ रामा भोसले, सागर उर्फ थोरात ( रा. जामगाव) या टोळीला मोक्का अंतर्गत पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी कारवाई केली आहे. भोसले व शिंदे हे दोघे सध्या पोलिसांच्या जाळ्यात आहेत. या टोळीविरुध्द दरोडा, खून, जबरी चोरी असे आठ गुन्हे आहेत. तालुका पोलिस, मंद्रूप, कामती, मंगळवेढा, मोहोळ, पुणे लोहमार्ग, आंध्रप्रदेशातील कर्नुल, अनंतपूर, हिंदूपूर या रेल्वे पोलिसातही अनेक गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुध्द मोक्का लावण्यासाठी प्रभू यांनी प्रस्ताव तयार करून कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर ही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.