Breaking News

किटकनाशक मारल्याने राळेगण थेरपाळ परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा पिकांचे नुकसान


जवळे /वार्ताहर/- पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ(माजमपूर) येथील शेतकरी सुनील पिराजी आढाव यांच्या शेतातील एक एकर कांदा पीकावर फवारण्यात आलेले किटकनाशक ( पाटनर) ने संपूर्ण कांदा पीक जळून गेल्याने तीन लाखाचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवस होऊन गेले तरीही कृषी अधिकारी पंचनाम्यासाठी फीरकले देखील नाही. 
राळेगण थेरपाळ(माजमपूर)वस्तीतील सुनील पिराजी आढाव यांनी यासंदर्भात सांगितले की, कांदा पीकावर पडलेल्या बुरशीजन्य रोगावर औषध मारण्यासाठी राळेगण थेरपाळ येथील कृषी सेवा केंद्रातून(पाटनर) हे कीटकनाशक फवारणी साठी आणलेे. परंतु फवारणी नंतर कांदा पीक चांगले न होता संपूर्ण कांदे खराब झाले. कांदे लागवडी पासून ते आज पर्यंत तीस हजार रुपये खर्च केले असून, शेतात मेंढरे बसविले तर औषधी कांद्याची पात खाऊन अनर्थ घडू शकतो. मजूर लावले तर आठ हजार रुपये खर्च पुन्हा करावा लागेल. त्यामुळे संबंधीत कृषी अधिकार्यांनी लवकरात लवकर पंचनामा करुन न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

अधिकारी संतोष डावखरे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच या परिसरातील तेरा जणांनी कांदा पीकावर कीटकनाशके फवारणी केल्यानंतर पीके जळाली आहेत. सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पीकाचे नमुने राहुरी कृषी विद्यापीठ तपासणी करण्यासाठी पाठविणार असून, येणाऱ्या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल. अशी माहिती संतोष डावखरे यांनी दिली.