Breaking News

भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादीच लढवणार

नवी दिल्ली : भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर शिक्कामोर्तब केलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीत राहुल गांधी यांनी निर्णय जाहीर केला. 


भाजपला जय महाराष्ट्र करत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुर्वाश्रमीच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लोकसभेच्या भंडारा-गोंदिया या रिक्त झालेल्या मतदार संघासाठी येत्या 22 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने ही निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला असून, राहुल गांधीसोबत झालेल्या चर्चेत भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँगे्रसकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर पालघर येथील लोकसभेची पोटनिवडणूक काँगे्रस लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
पटेल यांनी पत्रकारपरिषद घेत भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँगे्रसकडे ठेवण्याबद्दल आग्रही भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे नाना पटोले यांचे मन कसे वळवायचे, हा प्रश्‍न पटेल यांच्यासमोर होते. मात्र शेवटी पटेल यांनी पटोले यांना पटवत, भंडारा-गोंदियांची जागा राष्ट्रवादीकडे खेचून आणण्यात यश मिळविले असून, त्या जागेवर खुद्द प्रफुल्ल पटेल लढणार असल्यामुळे, खरी रंगत येणार आहे. 
यावेळी बोलतांना पटेल म्हणाले की, नाना पटोले हे माझ्या लहान भावासारखे आहेत. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, येत्या काळात आम्ही सोबत काम करु. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. याबाबत येत्या 9 मे रोजी उमेदवाराची घोषणा करण्यात येईल. पक्षश्रेष्ठींनी यापुढील काळात भाजपा-सेनेविरोधात मोर्चे काढण्याच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी पटेल यांना छगन भुजबळ यांच्याविषयी विचारणा केली असता, छगन बुजबळ यांना जामिन मिळालाच्या आनंद आहे आणि भविष्यात ते निर्दोषही सुटतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच भुजबळांना जामिन मिळू न देण्यास भाजपच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका करीत भाजपामधून बाहेर पडलेले माजी खासदार नाना पटोले यांनी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीचा 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा भाजपाने मंजूर केला होता. त्यामुळे पालघरसह या मतदारसंघात 28 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे.