Breaking News

भंडारा गोंदिया राष्ट्रवादीला तर पालघर काँग्रेसला

भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणुक होत असून, ही जागा कॅांग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तर पालघरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. माजी खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.