पोटनिवडणुकीच्या एक्झिट पोलवर बंदी
पालघर - लोकसभा पोटनिवडणूक निकालपूर्व अंदाज (एक्झिट पोल) वर्तवण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे आता या पोटनिवडणुकीचे एक्झिट पोल कोणालाही वर्तविण्यात येता येणार नाहीत. पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 28 मे’ला मतदान होणार आहे. आयोगाने लोकप्रनिधित्व अधिनियम 1951चे कलम 126(2) (ख) नुसार 28 मे 2018ला सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत जनमत चाचणी घेता योणार नाही. तसेच इलेक्ट्रॉनिक अथवा अन्य माध्यमांव्दारेही प्रसारित करण्यावर बंदी आहे. मतदान संपेपर्यतच्या 48 तासात एक्झिट पोल तसेच मतदान सर्व्हे आणि ओपिनियन निकाल कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यास अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे दाखविण्यास प्रसारणावर बंदी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.