ज्येष्ठ मातृ-पितृ तुल्यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा
अळकुटी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरचे माजी सभापती कुंदनकाका साखला यांच्यावतीने ज्येष्ठ मातृ-पितृ तुल्यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे व खा. दिलीप गांधी, जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा, उपाध्यक्ष बालचंद खरवड, जैन राष्ट्रीय युवा संरक्षक पारस मोदी, अशोक पगारिया, जैन राष्ट्रीय महिला अध्यक्षा रूचिरा सुराणा, ललीत मोदी, प्रातिंय अध्यक्ष सतिष लोढा, मनोज शेठीया, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी, सतिष चोपडा, प्रविण भंडारी, राजेंद्र बोथरा, महावीर नहार, अजय ब्रम्हेचा, मंत्री आदेश खिंवसरा, नंदकुमार भटेवरा, राजेंद्र चोरडिया, बाळासाहेब चोरडिया, प्रकाश सुराणा, सचिन साखला, अतुल साखला तसेच जैन कॉन्फरन्सचे सर्व पदाधिकारी, माजी जि. प. अध्यक्ष सुजीत झावरे, पुणे जिल्हा परिषदेचे शरद लेंडे, रोहिणी काटे, पुष्पा वराळ, भास्कर उचाळे, मधुकर उचाळे, भोसरी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, प्रेस आळेफाटा, शिरूर, अहमदनगर, नाशिक व पारनेर तालुक्यातील सर्व जैन संघाचे. पदाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष लियाकत शेख सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात (1306) एक हजार तिनशे सहा ज्येष्ठ महिला व पुरुषांचा फेटा, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व महिलांना साडी, सन्मान चिन्ह देवुन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार सागर साखला यांनी मानले.
यावेळी बोलतांना सत्कारमुर्ती कुंदनकाका साकला म्हनाले की, माझ्या मुलांनी माझी 71 (एक्काहत्तरावी) करण्याचा प्रस्ताव मांडला, मी लगेच सांगितले की, माझा सत्कार करण्यापेक्षा माझ्या भागातील पंच्याहत्तर वयोगटातील मातृ-पितृ तुल्यांचे आदरातिथ्य करावे, त्यावरून माझ्या मुलांनी 1306 लोकांचा सन्मान केला. जिवनाचे सार्थक झाले.
-कुंदनकाका साखला