Breaking News

शिरूरमध्ये मराठा सोयरीक ग्रुपचा 22 वा वधु-वर थेट भेट मेळावा राज्यभरातून उपस्थित राहणार वधु-वर


मराठा सोयरीक ग्रुप आयोजीत मराठा समाज वधु-वरांच्या 22 व्या राज्यांतर्गत परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळावा शनिवार दि. 26 मे 2018 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत शिवसेवा मंदिर, बसस्थानकाजवळ शिरूर, पुणे येथे होणार आहे. मराठा समाजामध्ये स्थळ बघताना सरकारी नोकरी, हुंडा, सौदर्य, आदी मालमत्ता अशा अनेक अपेक्षा वाढल्यामुळे लग्न जमवणे ही प्रक्रिया अवघड झाल्याने मेळाव्याची गरज आहे. असे सामाजिक कार्यकर्ते कैलास कौठाळे यांनी सांगितले. मेळाव्याबाबत माहिती देताना अमृतेश झांबरे व मराठा सोयरीक ग्रुपचे संचालक अशोक कुटे यांनी सांगितले की, मेळाव्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे जोडीदार शोधता येतो. आता जिल्हानिहाय मेळावे असल्यामुळे इच्छुक वधूवरांनी व पालकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. हा मेळावा शिरूर शहारातील शिवसेवा मंदिर, बसस्थानकाजवळ शिरूर, पुणे येथे सकाळी 10 ते 3 या वेळेत होणार आहे. आतापर्यंत शासकीय मान्यता प्राप्त असलेले मराठा सोयरीक ग्रुपचे राज्यातील विविध जिल्ह्यात 21 यशस्वी वधु-वर मेळावे झाले आहेत. त्या मेळाव्यांच्या व ग्रुपच्या कामाच्या उत्तम प्रतिसादामुळे दीड वर्षात 147 विवाह जमले आहेत. या मेळाव्यात वधु-वरांची नोंदणी होऊन वधू-वरांना त्याच दिवशी सर्व बायोडाटा नोंदणीची पीडीफ यादी देण्याचा विचार आहे. वरीलपैकी कोणत्याही मेळाव्यासाठी अ.नगर मधील ओम गार्डन येथील संपर्क कार्यालयात किंवा मेळाव्याच्या ठिकाणी देखील नाव नोंदणी करता येईल. या मेळाव्यात औरंगाबाद, बीड, अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, ठाणे, मुंबई अशा अनेक विविध जिल्ह्यातील वधु-वर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये अनुरूप वधू-वरांना त्यांची ओळख, माहिती सांगून आपल्या जोडीदाराबद्दल असणार्‍या अपेक्षा व्यक्त करता येणार आहेत. तसेच मराठा समाजाच्या उपवर वधू-वरांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोडीदार निवडता येणार आहे. या मेळाव्यामध्ये वधूवरांनी स्वतः फोटो बायोडाटासह उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अजय येणारे, प्रमोद सातपुते, दतात्रय शिंदे, बाळासाहेब भोर, संभाजी औटी, सागर दरेकर, शिवाजी रोकडे, बाळासाहेब वाकचौरे यांनी केले आहे.