बेघरांच्या आंदोलनात रेड क्रॉस कर्मचारी सहभागी
अहमदनगर । प्रतिनिधी । 10 - क्षयरोगींच्या उपचारार्थ सुरु करण्यात आलेल्या अरणगाव येथील रेड क्रॉस सोसायटीच्या टि.बी. सीमनॅटेरीयम संस्थेची सरकारी जमीन अनेक वर्षा पासून पडिक आहे. या जमीनीवर रेड क्रॉस सोसायटीच्या कर्मचार्यांचे पुनर्वसन होण्यासाठी व उर्वरीत जागेत बेघरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मेरे देश मे मेरा अपना आंदोलनाच्या वतीने मागणी करण्यात आली. बेघरांच्या वतीने शुक्रवार दि. 22 जानेवारी रोजी करण्यात येणार्या भुमिगुंठा संविधानिक न्यायाग्रह आंदोलनात रेड क्रॉस सोसायटीचे कर्मचारी देखील सहभागी होणार आहे.
दुसर्या महायुध्दानंतर क्षयरोगींना समाजातून बहिष्कृत केले जात असताना 1952 साली अरणगाव येथे टि.बी. सीमनॅटेरीयम रेड क्रॉस सोसायटीची स्थापना झाली. अरणगांव येथील गट नं.599 हेक्टर 89 आर एकंदर सुमारे 25 एकर सरकारी जमीन रेड क्रॉस सोसायटीला देण्यात आली. क्षयरोगींना रेडक्रॉस सोसायटीमध्ये उपचारार्थ आश्रय मिळत होता. या संस्थेत कोणेतेही कार्य चालू नसल्याने सदर जागा पडिक आहे. या पडिक जागेत बेघरांचा प्रश्न मार्गी लागणार असून, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने 5 एकर जमीन संस्थेतील कर्मचार्यांच्या पुनर्वसनाठी तर उर्वरीत 20 एकर जागेत सुमारे 700 बेघरांचे प्रत्येकी 1 गुंठ्याने घरे होऊ शकणार असल्याचे अॅड.कारभारी गवळी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले.