इराणकडून केल्या जाणा-या तेल खरेदीत कपात होण्याची शक्यता
नवी दिल्ली, दि. 04 - इराणकडून केल्या जाणा-या तेल खरेदीत एक चतुर्थांश इतकी कपात केली जाण्याची शक्यता आहे. इराणच्या फरजाद बीनैसर्गिक वायू क्षेत्राच्या विकासासाठीचे अधिकार भारतीय तेल कंपन्यांना नाकारले जाणार असतील तर भारतीय तेल कंपन्या इराणकडून केल्या जाणा-या खरेदीत कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या समस्येवर तोडगा निघाल्यास सरकारी तेल कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, मेंगलुरु रिफाइनरी, पेट्रोकेमिकल्स लिमिटेड व इंडियन ऑइल कॉर्परेशन या इराणकडून करण्यात येणा-या खरेदीत कपात करू शकतात.
असे झाल्यास इराणकडून भारतात आयात केले जाणारे तेल दररोज 3,70,000 बॅरल इतके असेल. चीन नंतर भारत हा इराणकडून तेल आयात करणारा देश असून भारताने आयातीत कपात केल्यास इराणला त्याचा फटका बसणार आहे.
असे झाल्यास इराणकडून भारतात आयात केले जाणारे तेल दररोज 3,70,000 बॅरल इतके असेल. चीन नंतर भारत हा इराणकडून तेल आयात करणारा देश असून भारताने आयातीत कपात केल्यास इराणला त्याचा फटका बसणार आहे.