Breaking News

भाषा संचालनालयामार्फत अनुवादकांना अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई : प्रशासकीय, कायदेविषयक, वैद्यकीय, महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा हिंदी, हिंदीचा इंग्रजी अनुवाद, मराठी मजकुराचा हिंदी आणि हिंदीचा मराठी अनुवाद करणाऱ्या अनुवादकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबतच्या अटी, शर्ती आणि इतर सविस्तर माहितीसाठी भाषा संचालनालयाचे bhasha.maharashtra.gov.inसंकेतस्थळ पहावे. तसेच अनुवादकांनी आपले अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छाया प्रतींसह भाषा संचालनालय,नवीन प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई - 4000051 येथे 31 मे 2018 पूर्वी पाठवावेत, असे आवाहन भाषा संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.