अग्रलेख - राजकीय दोषांची कावीळ !
महाराष्ट्राच्या राजकारणांतील गेल्या आठवडयात दोन महत्वाच्या घटना घडल्या. प्रथम घटना म्हणजे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांना क्लीन चीट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात दिली. तर दुसरी म्हणजे राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते छगन भुजबळ यांना तब्बल दोन वर्षांनंतर जामीन मिळाला. वास्तविक या दोन्ही घटनांचा महाराष्ट्राच्या राजकारणांवर परिणाम करणार्या आहेत. दोघेही बहुजन समाजातील नेते असून, ओबीसी संघटनावर दोघांची मोठा पगडा आहे, प्रभुत्व आहे. त्यामुळे खडसे यांना मिळालेली क्लीन चीट आणि भुजबळ यांना मिळालेला जामीन महाराष्ट्राच्या राजकारणांतील पुढील दिशा ठरविणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सातत्याने होणारे आरोप, आणि त्यामुळे व्यथित होणारे नाथाभाऊ याचे चित्र महाराष्ट्राने अनेकवेळेस पाहिले. नाथाभाऊ यांच्यावर अनेकवेळेस गंभीर आरोप होऊन देखील कुठेही आक्रस्ताळेपणा न करता, न्यायीक लढा नाथाभाऊ लढत होते. अखेर भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणांमध्ये नाथाभाऊ यांना क्लीन चीट देणारा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाला सादर केल्यामुळे नाथाभाऊंना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप या पक्षाचा विस्तार करण्यात नाथाभाऊंचा गोपीनाथ मुंडे यांच्या खालोखाल वाटा. आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत संघटनात्मक वाढ करण्यासाठी नाथाभाऊ सदैव अग्रेसर असत. त्यानंतर कुठे 2014 मध्ये भाजपाची सत्ता राज्यात आली. महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांच्यावर बेछूठ आरोप करण्यात आले. विशेषत: राज्यातील ओबीसी नेत्यांची संपूर्ण वाताहत करण्याची संधी सत्ताधार्यांनी सोडली नाही. खडसे भाजपात होते, म्हणून तरले. वास्तविक खडसे यांच्यावर आरेाप झाल्यानंतर देखील खडसे डगमगले नाहीत. तर त्यांनी नेहमीच प्रसारमाध्यमांसमोर येत आपण निर्देाष असल्याचे सांगितले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, त्यांच्यावर टीका करणार्या अंजली दमानिया. अंजली ताईंना खडसेच कसे दिसले. फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील सगळे नेते निर्दोष आहेत का? तसे नसतील तर मग अंजलीताईंनी त्यांच्यावर टीकेची झोड का उठवली. छगन भुजबळ यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणार्या, भुजबळ तुरूंगात गेल्यानंतर देखील त्यांना विशेष ट्रीटमेट मिळत असल्याच्या नावाखाली आकंडतांडव करणार्या अंजलीताईंना भुजबळ आणि खडसे या दोन नेत्यांखेरीज इतर नेते दिसले नाहीत का? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील सगळे मंत्री काही साव नाहीत. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता असतील, शिक्षणक्षेत्रांचा ज्यांच्यामुळे विनोद झाला, ते तावडे यांच्या शिक्षणविभागातील अंदाधुंदी अनेकवेळेस प्रसारमाध्यमांसमोर आली. मात्र त्याचे पुढे काय झाले. त्यांच्यावर आरोप करण्यासाठी दमानिया ताई काही पुढे आल्या नाही. त्यामुळे दमानिया यांना केवळ ठराविक नेत्यांच्या राजकीय द्ेषाची कावीळ तर झाली नाही ना? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत दमानियां यांनी ओबीसी चळवळीतील राज्यातील दोन नेते म्हणजेच खडसे आणि भुजबळ यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी दमानिया ताईंनी सोडली नाही. असे असले, तरी भुजबळ तुरूंगाबाहेर आले आहे. त्यांची राजकारणांची पुढील दिशा काय राहील. हा येणारा काळच ठरवणार आहे? त्यामुळे येणार्या काळात भुजबळांचे राजकीय गणित, ओबीसी संघटनात्मक पातळीवर बांधणी, ही संपूर्ण गणिते येणार्या काळात स्पष्ट होतीलच. मात्र यामुळे विरोधकांना धडकी भरली असणार यात शंकाच नाही. ?