Breaking News

नाना पटोलेंचा राजकारण संपवु - नितीन गडकरी


भंडारा, दि. 26, मे - भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत बीजेपी उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारासाठी नीतीन गडकरी यांची भंडारा इथे रेल्वे ग्राउंड वर सभा होती, सभेला रामदास आठवले आणि चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते, सभेला संभोधित करतांना मागील 4 वर्ष्यात परिवहन मंत्री म्हणून काय केले सांगितले तर देशात पहिल्यादांच 14 पदरी रस्ते निर्मिती आम्ही केली, येणार्‍या कळात भंडारा नागपूर मेट्रो सुरु होण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले, देशात शेतकर्‍याचनही परिस्थिती वाईट आहे मागील सरकारने शेतकर्‍यानं साठी काहीही केले नाही मात्र आमच्या सरकारने शेतकर्‍यांसाठी भविष्याच्या योजना बनविले आहे, त्याचाच एक भाग म्हणजे तनसापासून एथॉनला बनविल्याचे कारखाने सुरु करू त्यामुळे शेतकर्‍यांचे अच्छे दिवस येतील, बीजेपी हि घराण्याची पार्टी नसून हि कार्यकर्त्यांची पार्टी आहे, मधू कुकडे यांचा बळीचा बकरा बनविल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, नाना पटोले विषयी बोलतांना गडकरी म्हणले नानाला अहंकार आहे त्याच्यामुळे बीजेपी हि निवडणूक जिंकत त्यांची औकात दाखवून देईल एवढंच नाही तर साकोली क्षेत्रातूननही त्यांचा राजकारण आम्ही संपवू असे आव्हानात्मक भाषण त्यांनी केले, जातीपातीच्या नावाखाली नाही तर विकासाच्या नावाने हेमंत पटले याना निवडून देण्याची विनंती त्यांनी या वेळी मतदारांना केली.