Breaking News

आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत नाशिक व उस्मानाबाद संघांचा दणदणीत विजय


नाशिक, दि. 26, मे - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्‍या 19 वर्षाखालील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये नाशिकने एक डाव व 121 धावांनी सातारा संघावर तर उस्मानाबाद संघाने एक डाव व 213 धावांनी लातूर संघाचा दणदणीत पराभव केला.

महात्मानगर येथील मैदानावर नाशिक संघाचा कर्णधार सौरभ गडाख याने प्रथम नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. नाशिकने आपला पहिला डाव 9 बाद 355 धावांवर घोषित केला. मागील सामन्यातील शतकवीर आनंद विश्‍वकर्मा याचे शतक 8 धावांनी हुकले त्याने 92 धावा केल्या तर सिद्धार्थ नक्का ने 60 धावा तर स्वप्नील शिंदे ने 59 धावा करत त्यास चांगली साथ दिली. मागे सामन्यात आपल्या भेदक मार्याने सतरा बळी घेणार्‍या रोहन थोरात याने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करत नाशिकचे आठ गडी बाद केले.

उत्तरा दाखल मैदानात उतरलेल्या सातारा संघाला डावखुरा फिरकी गोलंदाज बाळकृष्ण सोनवणे याने भेदक गोलंदाजी पुढे सर्व बाद 172 धावा करता आल्या व फॉलोऑन ला सामोरे जावे लागले, लालकृष्ण ने 7 गडी बाद केले, 183 धावांनी पिछाडीवर पडलेला सातारा संघ हर्षल सेंनभक्त व सिद्धार्थ नक्का यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे सर्व बाद 62 धावा करू शकला, व नाशिक संघ 1 डाव व 121 धावानी विजयी ठरला.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या उस्मानाबाद विरुद्ध लातूर या सामन्यांमध्ये उस्मानाबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली उस्मानाबाद संघाचा कर्णधार अभिषेक पवार याने 203 धावाची तडाखेबंद खेळी करत 8 बाद 416 धावांवर आपला डाव घोषित केला. उत्तरादाखल मैदानात उतरलेला लातूर संघ यश लोमटे च्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे 82 धावा मध्ये गारद झाला. यश ने 5 गडी बाद केले, फॉलोऑन घेऊन मैदानात उतरलेला लातूर संघ आपल्या दुसर्‍या डावात 121 धावा करू शकला. त्यामुळेच उस्मानाबाद संघ 1 डाव व 213 धावा व विजयी झाला, सचिन माळीने सहा गडी बाद केले.