Breaking News

नांदेडच्या संशोधकाने बनविला जगातील सर्वात लहान उडणारा रोबोट


मुंबई, दि. 26, मे - मूळचे नांदेड येथील व सध्या अमेरिकेत असलेले संशोधक योगेश चुकेवाड व त्यांच्या टिमने नुकताच युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये जगातील सर्वात लहान, वायरलेस उडणार्‍या रोबोटची निर्मिती केली आहे. या रोबोटचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन 190 मिलीग्राम आहे. दिसायला किटका सारखा आहे. त्यांच्या संशोधनाचे प्रक्षेपण घखठज-7 ह्या अमेरिकन दूरचित्रवाहिनीवरून दाखवण्यात आले आहे.

संशोधक योगेश चुकेवाड हे नांदेडमधील भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी तथा जेष्ठ बालसाहित्यिक माधव चुकेवाड यांचे चिरंजीव आहेत. योगेशचे शिक्षण नांदेडमधील महात्मा फुले विद्यालय येथे झाले. त्यांनी आय.आय.टी. पवई (मुंबई) येथे बी. टेक तर अमेरिकेत पदव्युत्तर पदवी -एम. एस. केले. आता ते युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिग्टन मध्ये संशोधन (पीएच.डी.) करत आहेत. या संशोधनाबद्दल विद्यापीठाचे संगणक शास्त्र विभागाचे डॉ. श्याम गोडलाकोटा म्हणतात की, या रोबोटसाठी एक लहान ऑन बोर्ड सर्किट वापरले आहे. या सर्किटमधील फोटोव्होडटाइक लेसरच्या सहाय्याने पंखाना वीजपुरवठा होते. रोबोटच्या वजनात भर न पडता वीजपुरवठा करण्याचा हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे.

यापूर्वी असा वायरलेस रोबोट किटक केवळ स्वप्न समजाला जायचा. आमच्या ह्या रोबोटने या कल्पनेला सत्यात उतरवले आहे, असे यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या डॉ. सॉयर फूलर यांनी सां गितले. योहानेस जेम्स व विक्रम अय्यर ह्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्किटवरचा मायक्रो कंट्रोलर ह्या त्या रोबोटच्या मेंदू सारखा असतो. तो त्याला कुठले पंख किती वेगात फडफडावयाचे ह्या बाबत संदेश देतो.
संशोधक योगेश चुकेवाड यांनी संशोधनाबद्दल सांगितले की, अवघड मार्गातून स्वत:हून आपली वाट शोधण्याची क्षमता रोबोफ्लायमध्ये असावी असा आमचा प्रयत्न आहे. याचा उपयोग गॅस दुर्घटनेच्या वेली तसेच पिकाची देखभाल करण्यासाठी होणार आहे. हे ब्रिसबेन येथील इंटरनॅशलल कॉन्फरन्स ऑन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन मध्ये हे संशोधन सादर करण्यात आले. या शोधाबद्दल देश-विदेशातील योगेशचे मित्र व त्यांचे शिक्षक डी. बी. नाईक, प्रमोद शीरपूरकर व महाराष्ट्राचे माजी कृषी सचिव सुरेश अंबुलगेकर, प्रभाकर कानडखेडकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.