‘संजीवनी’चा सीबीएसईत शंभर टक्के निकाल
कोपरगांव : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाने {सीबीएसई} मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले. या परीक्षेत संजीवनी अकॅडमीचा निकाल १०० टक्के लागला, अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या श्रीनीला काला यांनी दिली.
या परीक्षेत आकांक्षा आसणे हिने ९०. ४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला. प्रज्वल काकडे याने ८७ टक्के आणि अवंतिका देवकर हिने ८५ टक्के मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या या यशाबद्द्दल संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, अकॅडमीच्या संचालिका मनाली कोल्हे आदींनी यशस्वी विद्यार्थी, शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.