‘यशोधन’ कार्यालयात १२ वी निकाल सुविधा
संगमनेर : १२ वीचा निकाल आज {दि.३०} जाहीर होणार आहे. माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयात १२ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत निकालाच्या प्रिंट काढून देण्याची सुविधा करण्यात आली आहे, अशी माहिती नामदेव कहांडळ यांनी दिली.
ते म्हणाले, माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शैक्षणिक संस्थांनी सातत्याने गुणवत्ता जपली आहे. गुणवत्तेमुळे संगमनेरचे विद्यार्थी कायम अग्रमानांकित राहिले आहेत. त्यामुळेच तालुक्यातील १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत निकालाची प्रिंट काढून देण्याची व्यवस्था ‘यशोधन’ या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र संगणक सुविधा सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी ‘यशोधन’ या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.