Breaking News

जामखेडमध्ये दोन ठिकाणी हातभटटी बनविणार्‍या अड्डयावर पोलिसांचा छापा


जामखेड : शहारात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असुन जामखेड पोलिस स्टेशनला नव्यानेच रूजू झालेले पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तालुक्यात चांगली कामगिरी चालवली आहे. काल त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक नामदेव सहारे व त्यांची टिमने सकाळी 6.30 व 7 च्या दरम्यान दोन ठिकाणी छापा टाकला, यामध्ये सचिन पवार (वय 24) राहणार सदाफुले वस्ती येथे त्याच्या राहते घरी हातभट्टीची दारू बनविताना त्यास रंगेहाथ पोलिसांनी पकडले. त्याच दरम्यान एका महिलेच्या घरी जामखेड बसस्थानकामागे सदाफुले वस्ती येथे राहत्या घरी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना गुप्त माहिती मिळाली होती, माहिती मिळताच गावठी हातभट्टी बनविताना त्या महिलेच्या घरी पोलिसांनी छापा टाकला.

सचिन पवार याचे हातभटटीवरील छाप्यात 19 हजार पाचशे रूपये किमतीचा मुद्देमाल जमा करत नष्ट करण्यात आला. तसेच त्या महिलेचा हातभटटीवर छापा टाकत एकूण 35 हजार रुपयेचा मुद्देमाल जमा करत नष्ट करण्यात आल्याची माहिती पो.नि. पांडुरंग पवार यांनी दिली. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन पवार यांची 3 हजार पाचशे रू किंमतीची दोन वेगवेगळ्या प्लास्टिक ड्रममध्ये 35 लीटर गावठी हातभटटी तयार दारू असलेली 16 हजार रू किंमतीचे गावठी हातभटटी दारू तयार करण्याचे रसायन वेगवेगळे बॅलरमध्ये एकुण 400 लिटर व दारु तयार करण्याचे साधने अंदाजे किंमतीचे असे एकुण 19 हजार पाचशे रूपयांचा माल पकडून छापा टाकत या ठिकाणी हातभट्टीची गावठी रसायन व दारू बनवण्याचे साहित्य जमा करून तो नष्ट करण्यात आले. तसेच एका महिलेच्या घरी हातभट्टी वर छापा टाकला त्यात 7500 रूपये दोन वेगवेगळ्या प्लास्टिक ड्रममध्ये 75 लिटर गावठी हातभटटी तयार दारू 2400 रुपये किमतीचे गावठी दारू तयार करण्याचे रसायन वेगवेगळे 3 बॅलर मध्ये एकुण 600 लिटर दारू आढळून आली असा एकुण 35 हजार रुपये हातभटटीचा मुद्देमाल महिलेच्या घरी छाप्यामध्ये पकडून दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. 

जामखेड पोलिस स्टेशनचे पो.नि.पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई दरम्यान पो.उपनिरीक्षक नामदेव सहारे, पो.कॉ. अल्ताफ शेख, पो.कॉ साने, पो.कॉ आवारे , पो.कॉ बडे, महिला पो. कर्मचारी रोहकले यांनी ही कारवाई केली. जामखेड शहरात विनापरवाना, बेकायदा गावठी हातभट्टी तयार करून दारू बनवणारे रॅकेट मोठे कार्यरत असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. अवैध व्यवसाय करणार्‍यांचे धाबे या मोहिमेने दणाणले आहेत.