Breaking News

जनतेला मुबलक पाणीपुरवठा ; राजकीय पोळी भाजण्याचा डाव


पैठण :  शहराला पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु असून विविध प्रभागातील नागरिकांना मुबलक व वेळेवर पाणी पुरवठा होत आहे. मात्र आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय मंडळी पाणी मिळत नसल्याची विनाकारण ओरड करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप नगर पालिका पाणीपुरवठा सभापती तथा भाजपा गटनेते आबासाहेब बरकसे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.
ते बरकसे म्हणाले, आगामी रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतः पाणीपुरवठा विभागाच्या यंत्रणेवर लक्ष ठेऊन आहोत. पैठण- आपेगाव विकास प्राधिकरणातून पैठण शहराची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. पाणीपुरवठा मुबलक व वेळेवर होईल. यासाठी जलकुंभाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या जलकुंभाची क्षमता जवळपास चार ते पाच वाढविण्यात आली आहे. या नवीन जलकुंभाचे काम लवकरच सुरु होणार आहे. नगराध्यक्ष सुरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या प्रयत्नामुळे ही योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे सभापती बरकसे यांनी सांगितले.