Breaking News

श्रीमती दीपा दिलीप चंदे यांची मनपाच्या दक्षतासमितीवर नियुक्ती


नगर- अन्न व नागरी पुरवठा ,ग्राहक संरक्षण,महाराष्ट्र राज्य यांनी महानगर पालिका स्तरावर आवेष्टित स्वरूपांच्या वस्तूंची अतिरिक्त दराने होत असलेल्या विक्रीस प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने लोकसहभाग महत्वाचा जाणून श्रीमती दीपा दिलीप चंदे यांची मनपाच्या दक्षतासमितीवरअशासकीय सदस्य पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीचे पत्र अन्न व नागरी पुरवठा ,ग्राहक संरक्षणमंत्री गिरीशजी बापट यांच्या हस्ते मंत्रालयात सौ.चंदे यांना देण्यात आले.
श्रीमती.दीपा चंदे यांच्या या निवडी बद्दल भारतीय जनता पार्टी प्रदेश समिती ,अहमदनगर कार्यकारणी व भाजपा महिला आघाडी तर्फे आभिनन्दन करण्यात आले आहे. सौ.चंदे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले असून चंदे कुकिंग क्लासेसमुळे त्या राज्यात प्रसिद्ध आहेत.सध्या त्या पंडीत दिनदयाल पतसंस्थेच्या संचालक असून आखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या महाराष्ट्र कार्यकारणी सदस्या म्हणून कार्यरत आहेत.

ग्राहकांचे हित व त्यांना दर्जेदार व योग्य वस्तू योग्य दरात मिळाव्यात यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही श्रीमती.चंदे यांनी यावेळी दिली.