सामाजिक कार्यकर्ते कोठारींमुळे वाचले पितापुत्र!
जामखेड ता. प्रतिनिधी - रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात जवळा येथील काळे पितापुत्र गंभीर जखमी झाले. मात्र या अपघाताची माहिती समजताच येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी स्वतः ची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त पिता-पुत्रांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यामुळे या दोघांचे प्राण वाचले.
मंगळवारी {दि. ८ } सायंकाळी आठच्या सुमारास जामखेडपासून ३० किलोमीटर अंतरावर दिलीप दादा काळे आणि अनिल दिलीप काळे हे दोघे पितापुत्र जामखेड, नेवासा येथील व्यवहार आटोपून घरी जात होते. आष्टीमार्गे खडकतरोडने जवळा येथे येत असतांना आष्टी ते खडकत रोडवर असलेले खड्डे चुकवत असताना त्यांची मोटारसायकल जोरात एक खड्ड्यात आदळून पलटी झाली.
यामध्ये हे दोघे पिता पुत्र गंभीर जखमी झाले. त्यावेळी योगायोगाने नरेंद्र जाधव हे लग्नसमारंभ आटोपून येत होते. त्यांना हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी लगेच १०८ नंबरवरून संपर्क केला. मिरजगाव, आष्टी, जामखेड असे सगळीकडे प्रयत्न केला. तब्बल एक तास गाडी मिळाली नाही. शेवटी त्यांनी संजय कोठारी यांना फोन केला. कोठारी अवघ्या २० मिनिटांमध्ये सहकारी राहुल घोडपडे यांच्यासह ३० किलोमीटर अंतरावरील घटनास्थळी पोहोचले. यावेळी एम. पाटील, बबन तुपेरे, नरेंद्र जाधव, राहुल घोडपडे आदींनी मदत केली.