नांदेड पोलीस भरती रद्द भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेमध्ये झाला होता घोटाळा
नांदेड : जिल्ह्यातील पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी नांदेडची पोलीस भरतीच रद्द केली आहे. तर मागील 7 दिवस पोलीस कोठडीत असलेल्या 12 जणांना मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एन. सचदेव यांनी 4 दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
नांदेड येथे झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेमध्ये काही जणांनी गडबड केल्याची शंका पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांना आली होती. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता नांदेड पोलीस भरतीत घोटाळ्यातील बिंग फुटले. यामधील आरोपी शिरीष बापुसाहेब अवधूत, स्वप्नील दिलीप साळुंके, नामदेव बाबुराव ढाकणे, ओमकार संजय गुरव, शिवाजी कृष्णा चेके, आकाश दिलीप वाघमारे, शेख सलीम शेख मोहम्मद, समाधान सुखदेव मस्के, किरणअप्पा मस्के, सुमित शिंदे, अब्दुल मुखीद अब्दुल मकसुद आणि संतोष माधव तनपुरे यांना 26 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले होते. या 12 जणांना न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले आहे.