कर्नाटकात दारू, पैशांचा महापूर 152 कोटी रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
येत्या 12 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्या सभांमुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे. आतापर्यंत निवडणूक काळात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालांच्या बाबतीत उत्तर प्रदेश अग्रभागी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये 193 कोटी 29 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. 2016 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीवेळी 130 कोटी 99 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.कर्नाटकात निवडणूक आयोगाने कठोर पाऊले उचलली असून राज्यांच्या सीमारेषेवर तपासणी केली जात आहे. निवडणूक होण्यास सात दिवसांचा अवधी शिल्लक असल्यामुळे आणखी मुद्देमाल जप्त होण्याची शक्यता आहे.