संभाजी महाराज जयंती निमित्त पोवाड्यांच्या गजरात शहरातून मिरवणुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्जेपुरा परिसरातून संभाजी महाराजांच्या जय घोषात मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये शाहिरांनी पोवाडे सादर करुन, संभाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा दिला. मिरवणुकीत संभाजी महाराज व मावळ्यांची वेशभुषा परिधान करुन सहभागी झालेल्या बाळगोपाळांनी सर्वांचे लक्ष वेधले.
शेरकर गल्ली येथे या मिरवणुकीचे समारोप होवून, संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर व्याखान झाले. प्रारंभी संभाजी महाराजांच्या प्रतिमेस नगरसेविका मालनताई ढोणे, कर्नल काशिद व छावाचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी देवेंद्र कवडे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे, मुख्य संयोजक तथा छावाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, शहर जिल्हाध्यक्ष मनोज कर्डिले, अॅड.भानुदास होले, अॅड.महेश शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, तालुकाध्यक्ष पै.नाना डोंगरे, पोपट बनकर, सुनिल गायकवाड आदि उपस्थित होते.
व्याख्यानात मार्गदर्शन करताना शिवशाहीर संभाजी टेके म्हणाले की, संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचे काम कथित इतिहासकारांनी केले. मात्र बहुजनांना खरा इतिहास समजला आहे. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचे विचार आत्मसात केल्यास युवा पिढी भरकटणार नाही. त्यांच्या आदर्शाने पुन्हा शिवशाही अवतरेल. जिजाऊंच्या संस्काराने शिवबा घडले. पालकांनी मुलांना वेळ देवून संस्कार रुजविण्याची खरी गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच आजकाळ लग्न कार्यात फॅशन म्हणून पाहुण्यांच्या स्वागताला मावळ्यांच्या वेशभुषेत युवकांना उभे केले जाते. ही मावळ्यांची विटंबना आहे. स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांच्या खाद्यांला खांदा लावून त्यांनी बलिदान दिले असून, ही प्रथा थांबविण्याचे त्यांनी आवाहन केले.
मालनताई ढोणे यांनी इतिहासाला उजाळा देवून, युवक-युवतींना प्रेरणा देण्यासाठी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला जयंतीचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. रावसाहेब काळे यांनी संघटनेच्या माध्यमातून चालू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. तसेच यावेळी ह.भ.प. अॅड.सुनिल तोडकर, प्रशांत टेके, मंदा फुलसौंदर, ह.भ.प. राजेंद्र महाराज यांनी संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले. शाहिर कान्हू सुंबे यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा इतिहास उलगडला.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक योगदानाबद्दल विजय भालसिंग, सुहास सोनवणे व रावसाहेब झावरे यांना राज्यस्तरीय शंभूराजे भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी योगिता देवळालीकर, नयना बनकर, सुभाष आल्हाट, बाळासाहेब पाटोळे, विनायक नेवसे, रजनी ताठे, आशा पालवे, अशोक कासार आदि उपस्थित होते. काढण्यात आलेल्या मिरवणुकीत युनिव्हर्सल डान्स अॅकॅडमीचे उत्कर्ष गावडे, तनिष्क पिंगट, राज परदेशी, संग्राम जरे, ऋतुजा जरे, दुर्गा चौरे, विनया भावसार, आर्यन, पलक बेल्हेकर, तन्वी चौरे आदि विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना सागर अलचेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल बागुल यांनी केले. आभार मनोज कर्डिले यांनी मानले.