Breaking News

पाणी फाऊंडेशनमुळे महाराष्ट्र जलमय होणार: गिरीष कुलकर्णी

अहमदनगर (प्रतिनिधी) गेल्या अनेक दिवसांपासून पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून चालु झालेल्या लोकचळवळीमुळे मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. यामुळे पाणी पातळी वाढत असून गतवर्षी महाराष्ट्र जलमय होणार असल्याचे प्रतिपादन सिनेअभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी केले.


तालुक्यातील श्रीक्षेत्र वाहिरा येथे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अंतर्गत माती पाणी परिक्षण उपक्रम राबवण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांना मार्गदशन करतांना ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. मेघना झांजे व सरपंच सौ. शकुंतला फरतारे , मुक्ताई बहुउद्देशीस संस्थेचे अध्यक्ष प्रा. दादासाहेब झांजे, प्रा. रतन फरतारे सर, उपसरपंच सतिषराव आटोळे, ह.भ.प. अब्दुल महाराज, ह.भ.प.गणेश महाराज, सावळेराम खामकर, विजय गाडे, द्रोपदाबाई तोटे, चंद्रकला झांजे, रमेश जेधे, सुनिल शेलार, फक्कड झांजे, सतिष चंदिले, आसाराम फरतारे आदी मान्यवर उपस्थित होते.
गिरीष कुलकर्णी व पुण्याहून आलेली पाणी फाऊंडेशनच्या टिमचे औक्षण करुन पारंपारीक पध्दतीने गाडी बैलामध्ये, ढोल ताशांच्या गजरात जल्लोशात मिरवणुक काढण्यात आली. या पारंपारीक पाहुनचाराने ते भाराऊन गेले होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, लोकचळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी सुरू केलेल्या पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून सर्व स्तरातून लोक सभागी झालेले आहेत. श्रमदानातून गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात श्रमदानाच्या माध्यमातून पाणी साठवणुक करण्याचे प्रशिक्षण व कार्य करण्यात आलेले आहे. या सर्वांचा परिणाम पावसाळ्यामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. पाण्याची पातळी 300 फुटांपर्यंत खाली गेलेली आहे. दरवर्षी गावोगाव उन्हाळ्यामध्ये टँकरणे पाणीपुरवठा केला जातो मात्र यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे पाण्याची पातळी टिकुण आहे. परंतु अशीच पाणी पातळी कायमस्वरुपी राहण्यासाठी सर्वांनी मिळून जलसंधारणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील व 75 तालुक्यातील 4000 गावांमध्ये ही स्पर्धा चालु आहे. राज्यात सर्वोत्तम तिन गावांमध्ये समाविष्ट होणार्‍या गावांना अनुक्रमे 75 लाख, 50 लाख, 40 लाख रुपये रोख बक्षिस देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त तालुक्यातील सर्वोत्तम गावाला 10 लाखांचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. सत्य मेवजयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून मागील वर्षी 1 हजार गावांमध्ये केलेल्या कामाची पावती म्हणून 10 हजार कोटी लिटर पाण्याची साठवणुक करण्यात आली आहे. त्या दुष्काळी गावातील पाण्याचे टँकर बंद होऊन पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे पोट भरण्यासाठी बाहेरगावी गेलेले लोक पुन्हा त्या गावामध्ये आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने जे काही पाटबंधार्‍याची कामे केलेली आहेत ती शासनाची कामं आहेत असं लोकांना वाटल्याने लोकांनी त्या कामाकडे तेवढ्या गांभिर्याने न पाहिल्याने जो परिणाम साधायला हवा होता तो साधता आला नाही. परंतु पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जेव्हा सर्व लोकांनी मिळून श्रमदानातून पाणी वाचवण्यासाठी व टिकवण्यासाठी जे कामे केले आहेत त्याबद्दल त्यांना आत्मियता वाटत असल्यामुळे ती कामे उत्कृष्ट दर्जाची व कोणत्याही खर्चाशिवाय झालेली आहेत. या कामातून पाणी वाचवण्याचे मोठे कार्य साध्य झालेले आहे.
पाण्याशी निगडीत समस्यांना स्त्रीयांनाच जास्त तोंड द्यावे लागते त्यामुळे पाणी फाऊंडेशनच्या कामामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात स्त्रीयांचा सहभाग लक्षणीय आहे. तुमचे काम ते माझे काम असा ध्यास घेऊन महाराष्ट्रभर दिड लाख जलमित्र काम करत असून जल साठवणुकीसाठी संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्यामुळे आपणही आपल्या गावात मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळवण्यासाठी जिद्देने सहभागी व्हावे असे अवाहन कुलकर्णी यांनी केले.
यावेळी चंद्रकला शेलार, रवी फरतारे, दत्तु फरतारे, भावेश पगारे, नवनाथ गाडे, मंगेश जेधे, निखील झांजे, सरस्वती पगारे, नामदेव गाडे, कचरु गाडे, कुंडलीक गाडे, आजिनाथ मेटे, नवनाथ जाधव, किसन पगारे, चरण पगारे, हिरामन पगारे, बबलु पगारे, हौसाबाई शेलार, वैजयंता पवार, ज्योती आटोळे, भाऊसाहेब मेटे, रंजना फरतारे, आनंद पंडीत तसेच पुण्यहून आलेली पाणी फाऊंडेशनची 15 सदस्यांची टिम, ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.