बहुमत सिध्द करण्यासाठी येडियुरप्पांनी मागितली मुदत
कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवान हालचाली घडत असून, राज्यपालांची भेट घेण्यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. सर्वाधिक संख्याबळ पाठीशी असल्याचा दावा करत भाजप नेते येडियुरप्पा यांनी राज्यपालांच्या भेट घेतली. सत्तास्थापनेसाठी मुदत मागितली आहे. त्यामुळे राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे राजक ीय वर्तृळाचे लक्ष लागले आहे. मात्र जेडीएसने काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर राजकारणाचे चित्र पालटले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करणारे भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बॅकफूटवर गेले आहेत. पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्नाटकात 112 जागांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे.