मनीषा लांबे डबल शतकवीर
राहुरी : भारतीय जीवन बीमा निगमच्या श्रीरामपूर शाखेत राहुरीच्या चेअरमन क्लब मेंबर मनिषा अनिल लांबे यांनी २०१७-१८ मध्ये २११ पाॅलिसी करून प्रथम डबल शतकवीर होण्याचा मान मिळवित शाखेत प्रथम क्रमांक मिळविला. लांबे यांनी सन २०१६-१७ मार्च आणि आॅगस्टमध्ये सलग दोन वेळा पुणे विभागात उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम डबल डायमंड शतकवीरचा बहुमान मिळविला होता. त्यांना राहुरी शाखा प्रबंधक प्रकाश पटारे, श्रीरामपूरचे शाखाधिकारी राव, सहय्यक शाखाधिकारी उदय बनसोड यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी लांबे यांना सी. एल. आय. ए. राजेंद्र वाघ, प्रा. रविंद्र पेरणे, अनिल लांब, राजेंद्र पेरणे यांचे विशेष सहकार्य लाभले. डबल शतकवीर होण्याचा मान मिळविल्याबद्दल लांबे यांचे अनेकांनी अभिनंदन केले.