दोन तोळयाची पोत चोरीला
कोपरगाव : बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत एका भामट्याने महिलेच्या गळयातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत ओढून नेली. या प्रकरणी श्रीमती भीमाबाई मुरलीधर गुंजाळ या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीसांत चेन स्नॅकिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी {दि. २ } दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बसमध्ये चढत असतांना गुंजाळ यांच्या गळयातील ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरीला गेली. या ठिकाणी असलेला पोलीस पाईंट सुरू करून एक पोलीस एक महिला पोलीस व होमगार्ड नेमावा, अशी मागणी नागरीक व आगार प्रशासनाने केली आहे.