Breaking News

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली, दि. 01 - पेट्रोलच्या दरात मंगळवारी मध्यरात्रीपासून लिटरमागे 2.58 रुपये; तर डिझेलच्या दरात लिटरमागे 2.26 रुपये वाढ करण्यात आली.  मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. यानुसार दिल्लीत पेट्रोलचा दर 65.60 रुपये प्रतिलिटर; तर डिझेलचा दर 53.93 रुपये प्रतिलिटर असेल, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून (आयओसी) जाहीर करण्यात आले आहे.
तेल कंपन्यांकडून नुकतीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा दरवाढीला सर्वसामान्य ग्राहकांना सामोरे जावे लागणार आहे.