Breaking News

ओखी चक्रीवादळ अरबी समुद्राच्या दिशेनं


ओखी चक्रीवादळानं उग्र रुप धारण केलं असून, अरबी समुद्राच्या दिशेनं ते सरकू लागलं आहे. केरळ, तामिळनाडूसह दक्षिण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत असून केरळमध्ये किमान 12 जणांचा बळी गेल्याची माहिती आहे. समुद्रात भरकटलेल्या 218 मच्छिमारांची नौदलानं सुखरुप सुटका केलीये. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. 
ताशी 130 किमी वेगाने वारे दरम्यान, वादळाचा वेग ताशी 110 ते 120 किमी होता. पुढील 24 तासांत लक्षद्वीपमध्ये ताशी 130 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले. लक्षद्वीप येथे काही ठिकाणी 20 सेमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.