सांगलीच्या नव्या जिल्हाधिकारी पदी विजयकुमार काळम-पाटील यांची नियुक्ती
सांगली, दि. 07 - सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची पुणे येथील भूजल सर्व्हेक्षण व विकास संस्थेच्या संचालकपदी बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश त्यांना सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला. आता त्यांच्या जागी मुंबई येथील फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम- पाटील यांची सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विजयकुमार काळम- पाटील सन 2004 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, रस्ते विकास महामंडळ व सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे. एप्रिल 2017 मध्ये त्यांची मुंबई येथील फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच त्यांची सांगलीच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. येत्या आठवडाभरात विजयकुमार काळम- पाटील सांगली जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
मावळते जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दि. 9 मार्च 2015 रोजी सांगली जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतला होता. त्यानंतर सव्वा दोन वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेकविध उल्लेखनीय कामे केली. सांगली ब्रँडिंगसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना विशेष यश मिळाले. याशिवाय अग्रणी नदी पुनर्जिवन, जलदूत एक्स्प्रेस, जलयुक्त शिवार, ई- गव्हर्नन्स व नूतन जिल्हाधिकारी कार्यालय अशी ठळक कामगिरी त्यांच्या नावावर आहे. शेखर गायकवाड यांची राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत येणा-या पुणे येथील भूजल सर्व्हेक्षण व विकास संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे.