नाशिक : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून अॅड. सहाणे रिंगणात
नाशिक, दि. 3, मे - शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेलेविाजी सहाणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून राष्ट्रवादीकडून आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी सहाणे यांना तिकीट देण्यात आले आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यासमवेत शिवाजी सहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तत्पूर्वी सकाळी साडेअकरा वाजता अॅड.शिवाजी सहाणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहरातील राष्ट्रवादी भवनात प्रवेश झाला. त्यानंतर विधानपरिषद उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिक ारी कार्यालयाकडे राष्ट्रवादीचे रवाना झाले.
विधानपरिषदेच्या नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्था आमदारकीसाठी शिवसेनेकडून नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना तिकीट देण्यात आले आहे. दराडे यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचा एक गट नाराज असल्याचे चित्र आहे. अॅड.शिवाजी सहाने यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल अशी सुरुवातीपासूनच आशा होती त्यामुळे उमेदवारी घोषित करण्याआधीच शिवसेनेकडून सोशल मीडियात प्रचाराला शिवाजी सहाने यांनी सुरुवात केली होती. मात्र मातोश्रीहून दराडे यांना तिकीट देण्यात आल्यामुळे शिवाजी सहाने समर्थक नाराज झाले होते.