जीवनधाराच्यावतीने 4 मे रोजी रोजगार मेळावा
नवी मुंबई, दि. 3, मे - जीवनधारा वॉर्ड र समिती रोजगार, व्यापार योगच्यावतीने सहावा मोफत भव्य रोजगार मेळावा म्हणजेच मेगा जॉब फेअर शुक्रवार दिनांक 4 मे 2018 रोजी भरविण्यात येणार आहे. कोपरखैरणेच्या सेक्टर 8मधील रा.फ.नाईक विद्यालयात हा मेळावा सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती या मेळाव्याचे आयोजक आमदार संदीप नाईक यांनी दिली आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेने हा लोकोपयोगी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यंदाचे या मेळाव्याचे सहावे वर्ष आहे. या मेळाव्यात स्थानिक कंपन्यांमधून स्था निक बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळत असल्याने या कंपन्यांमध्ये उमेदवार टिकण्याची टक्केवारी देखील वाढली आहे.