सप्तश्रृंगीगडावर दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या बसला अपघात ; 3 ठार
नाशिक, दि. 3, मे - सापुतारापासून 7 किमी असलेले गाव कनाशी रस्त्यावरील गायदरी घाटात आज पहाटे चारच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बस (ॠ.5.-न.4850) कोसळली. चालकाला झोप येत असल्याने बसवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत तीन प्रवासी ठार झाले, तर 22 जखमी झाले. मृतांत 2 महिला आणि एका 8 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तर जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
बसमधील प्रवासी हे शेजारी असलेल्या गुजरातमधील नवसारी आणि सुरतचे रहिवासी असल्याचे समजते. वणी येथील सप्तश्रृंगीगडावरील देवीच्या दर्शनासाठी ते सुरतहून महाराष्ट्रात येत असतानाच हा अपघात घडला. जखमींवर महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर असलेल्या बोरगाव (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काही जखमींना आहवा- डांग येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.