Breaking News

मुलांचे आव्हान खडतर; महाराष्ट्राच्या मुलींना बाद फेरीची संधी


पंजाबातील लुधियाना येथील गुरू नानक क्रीडा संकुलात ६९व्या राष्ट्रीय आंतरराज्य कनिष्ठ (१८ वर्षांखालील) बास्केटबॉल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. तब्बलतीन वर्षांनंतर राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या संकुलात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धामुळे अकादमीतील खेळाडूंना चांगलाच फायदाझाला असून देशाला सतनाम, यादवीर, गुरप्रीतसारखे अनेक नामवंत खेळाडू प्राप्त झाले आहेत.
गटवार साखळी सामन्यानंतर वरिष्ठ पातळीतील गटामधील तळाचे दोन संघ कनिष्ठ गटात फेकले जाणार आहेत. त्याचवेळी कनिष्ठ पातळीतील सर्वोच्च दोनसंघांना वरिष्ठ पातळीत प्रवेश मिळून बाद फेरीत खेळता येणार आहे. गतवर्षी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या महाराष्ट्राच्या मुला-मुलींना यंदा अतिशय उष्णवातावरणाचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्राच्या मुलांना यंदा गटातच कडवे आव्हान असून तुलनेत मुलींना मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठीफारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. युवा आंतरराष्ट्रीय खेळाडू खुशी डोंगरे आणि नेहा साहू तसेच अनुभवी श्रेया दांडेकर, कर्णधार साक्षी कोटियन, सुझान पिंटो,सिया देवधर, आभा लाड यांच्या समावेशाने मुलींचा संघ समतोल आहे.