Breaking News

परदेशातील सामन्यांच्या अनुभवाची गरज- सुनील छेत्री

मुंबई : पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात अनेक बलाढय़ संघांचा सहभाग असतो. त्यामुळेच तेथेचांगले यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंना परदेशातील सामन्यांचा अधिकाधिक अनुभव देण्याची गरज आहे, असे भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने सांगितले.
मागील स्पर्धेत भारताला सर्व सामन्यांमध्ये दारुण पराभवास सामोरे जावे लागले होते. छेत्री म्हणाला, ‘‘आपला संघ घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करतअसतो. मात्र परदेशातील मैदानांवर अनेक वेळा आमची कामगिरी खराब होत असते. हे लक्षात घेऊनच आगामी सहा महिन्यांमध्ये वरचढ संघांबरोबर सराव सामनेखेळण्याची संधी आम्हाला मिळाली, तर निश्चितपणे आमची कामगिरी चांगली होईल. आम्हाला या स्पर्धेत संयुक्त अरब अमिराती, थायलंड व बहरिन यांच्याशीखेळावे लागणार आहे. या संघांविरुद्ध विजय मिळवण्याची आम्हाला संधी आहे, तरीही अमिरातीच्या खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणारआहे. त्यामुळेच आम्हाला सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागेल. थायलंडच्या संघाने गेल्या सहा वर्षांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. सहा-सात वर्षांपूर्वी आमचात्यांच्याबरोबर सामना झाला होता व हा सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता.’’