Breaking News

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चमकदार बॅडमिंटनपटूंचा गौरव


नवी दिल्ली : नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या बॅडमिंटनपटूंचा भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या रोख पारितोषिकदेऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात तब्बल एक कोटी तीस लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली. यामध्ये ५० लाख रुपये भारतीय चमूला देण्यात आले. वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळवल्याने संघटनेकडून सायना नेहवालला २० लाखांचा पुरस्कार देण्यात आला. पीव्ही सिंधू आणि के. श्रीकांत यांना रौप्यपदकमिळाल्यानबद्दल १० लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. 

युवा पुरुष दुहेरी खेळाडू सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांनीही राष्ट्रकूलस्पर्धेत पुरुष दुहेरीत पहिल्यांदा पदक मिळवून दिले. त्यांना प्रत्येकी ७.५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. महिला दुहेरी खेळाडू अश्विनी पोन्नप्पा व सिकी रेड्डीजोडीला ब्राँझपदक मिळविल्याबद्दल प्रत्येकी ३.७५ लाख रुपये देण्यात आले.

खेळाडूंबरोबरच संघाच्या प्रशिक्षकांनाही यावेळी गौरविण्यात आले. मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंदला १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यासोबतदुहेरीचे प्रशिक्षक टॅन किम यांना ३ लाख रुपये देण्यात आले. सहाय्यक प्रशिक्षक सियादथ उल्लाह सिद्दीकी यांना ३ लाख तर, क्लरन, जॉनसन आणि गायत्री(फिजिओ) यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. देशामध्ये बॅडमिंटन खेळाची लोकप्रियता पाहता नवीन कौशल्याला वाव देण्यासाठी पहिल्यांदाच भारतीयबॅडमिंटन संघटनेतर्फे युवा खेळाडूंसाठी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. दिग्गज खेळाडू प्रकाश पदुकोण यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन केलेजाणार आहे.