सोलापूर, - सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी मुंबई राजभवनात मुलाखती होऊन सहा दिवसांचा कालावधी लोटला असला तरी नाव अद्याप गुलदस्त्यातच आहे. पाच जणांनी मुलाखती दिल्या असून, कुलगुरू कोण होणार? असा प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दि.21 एप्रिल रोजी घेतल्या आहेत. विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठीच्या शर्यतीतून सोलापूरचे सर्वच उमेदवार यापूर्वीच बाहेर पडले होते. मुलाखतीसाठी पात्र अंतिम पाचही उमेदवार हे सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेरचे होते. त्यामुळे नवीन कुलगुरू सोलापूर विद्यापीठाबाहेरचेच मिळणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पात्र अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती मुंबई येथे घेतल्या आहेत.यामध्ये प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस (नागपूर), प्रा. डॉ. कुंडल (नागपूर), प्रा. डॉ. भालेराव (पुणे), प्रा. डॉ. सोनवणे (पुणे) आणि प्रा. डॉ. भोसले (मुंबई ) यांचा समावेश होता. यातून एकाची वर्णी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी लागणार आहे. दरम्यान, सोलापूर विद्यापीठ व मुुंबई विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूचे नाव एकाचवेळी घोषित होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
सोलापूरकरांना कुलगुरू निवडीची प्रतीक्षा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:42
Rating: 5