Breaking News

कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला धमकी


पाथर्डी (प्रतिनिधी) करंजी येथील बियर शॉपी येथे श्रीरामपूर विभागाचे दुय्यम निरीक्षक महादेव झेंडे हे कारवाई करत असताना त्यांना प्रमोद पाठक याने हॉटेलचे शटर बंद करत झेंडे यांच्याकडून कारवाईचा कागद हिसकावून घेतला. तसेच त्यांना जीवे मारण्याची आणि खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. आज { दि. १२ } सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची दोन दिवशीय मोहीम सुरु आहे. त्यानुसार फिर्यादी महादेव झेंडे, जवान जे. जे. सानप, जवान टी. बी. करंजुले हे आज {दि. १२} सकाळी साडेनऊ वाजता करंजी येथील बियर शॉपी उघडलेली दिसली. वास्तविक पाहता बियर शॉपी उघडण्याचा टायमिंग हा सकाळी ११ ते रात्री ११.३० हा आहे. मात्र त्यापूर्वीच हि बियर शॉपी उघडलेली दिसली. तसेच येथे जादा दराने मालाची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विभागीय गुन्हा नोंद करण्यासाठी झेंडे आणि त्यांचा स्टाफ तिथे गेला होता. वेळेच्या अगोदर बियर शॉपी का उघडली, याचा जाब या पथकाने पाठक याला विचारला. निर्धारित किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री केल्यामुळे त्या शॉपीवर कारवाईचा जबाब नोंदवत असताना प्रमोद पाठक याने शटर बंद करून घेतले. झेंडे व त्यांच्या सहकार्यांना डांबून ठेवले. त्यानंतर खिडकीतून दमदाटी करून कागदपत्रे माझ्याकडे द्या नाहीतर फाडून टाका, असे म्हटले. त्याने झेंडे यांच्या हातातला जबाबचा कागद हिसकावून घेतला. कारवाई करायची तर करा पण मी तुम्हाला कायमस्वरूपी संपवून टाकील तसेच माझ्या गल्यामधील एक लाख रुपये चोरले, असा खोटा गुन्हा दाखल करील, अशी पाठक याने धमकी दिली. या दबंगगिरीप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये प्रमोद पाठक याच्याविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.