Breaking News

सत्काराला फाटा देवुन जगदंबा विद्यालय विकासाला निधी

कुळधरण / प्रतिनिधी । राशीन येथील श्री जगदंबा विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विकास मोढळे यांच्या मुलाचा विवाह राशिन येथे पार पडला. विवाहाप्रसंगी करण्यात येणार्‍या सत्कार समारंभास फाटा देऊन 5000 रुपये रक्कम येथील श्री जगदंबा विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी देणगी म्हणून दिली. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पावसाळा सुरू होताच 5000 रोपे विद्यालयास देणार असल्याचे विकास मोढळे यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय देशमुख, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप खंडागळे, पर्यवेक्षक राजकुमार चौरे व हनुमंत लोंढे, सहशिक्षक विक्रम घालमे, सचिन डमरे, अर्जुन जंजीरे, मालोजी भिताडे आदी उपस्थित होते. तसेच यापूर्वी विद्यालयाची पडिक शेती वहित करण्यासाठी त्यांनी आपली जेसीबी मशीन विनामोबदला सुमारे 50 तास चालवून विद्यालयास मदत केली आहे.