Breaking News

वारजेत ‘सेक्स रॅकेट’चा भंडाफोड

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने वारजे येथे मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांना दोन अल्पवयीन मुलींची सुटका करत एका महिलेला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी-एनडीए रोडवरील धावडे बिल्डींगमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला आणि वेश्या व्यवसाय करवून घेणा-या एका महिलेला ताब्यात घेत दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. आरोपी महिलेविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.