Breaking News

आरटीईची दुसरी यादी जाहीर करण्याची मागणी


पुणे, दि. 17, मे - आरटीईची 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाही होऊन दीड महिने झाले, तरीही प्रवेश पूर्ण न झाल्यामुळे प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश नाक ारणार्‍या शाळांवर कारवाई करावी आणि आरटीईची दुसरी यादी जाहीर करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार 25 कोट्यातून राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. त्यानुसार आरटीईची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार शिक्षण विभागाने प्रवेश देण्यास सुरुवात केली. मात्र, शुल्क परतावा न दिल्याच्या कारणावरून काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी राखीव जागांवर प्रवेश देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.आरटीईमधील प्रवेश नाकारणार्‍या शाळांवर प्रशासक नेमून कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले. मात्र, ते कागदावरच राहिले असून, त्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडून झालेली नाही. प्रवेश नाकारणार्‍या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अभय देण्याचे काम शिक्षणाधिकार्‍यांकडून होत आहे, असा आरोपही पालकांनी केला आहे.