Breaking News

सोलापूर-मुंबई एक्स्प्रेस 16 मेपासून धावणार


सोलापूर, दि. 17, मे - सोलापूर -मुंबई एक्स्प्रेस अर्थात मिनी सिद्धेश्‍वर ही रेल्वेगाडी बुधवारपासून गदग -मुंबई एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. मात्र, सोलापूर ते मुंबई दरम्यान ती सुपरफास्ट असणार आहे. तिच्या वेळेत व थांब्यात बदल नाही. क्रमांकात बदल झालेला आहे. गदग ते मुंबईसाठी नवा क्रमांक 11139 हा तर मुंबई ते गदग साठी 11140 आहे. ही गाडी पूर्वी बुधवारी धावत नव्हती. आता ती शुक्रवारी धावणार नाही. 
गदगवरून दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी निघेल. सोलापूरला रात्री साडेआठ वाजता पोहचेल. येथून 9 वाजून 10 मिनिटांनी निघेल. मुंबईला पहाटे 5 वाजून 10 मिनिटांनी पोहचेल. परतीची गाडी मुंबईवरून रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी निघेल. सोलापूरला पहाटे 5 वाजून 30 मिनिटांनी पोहचेल. 10 मिनिटांचा थांबा घेऊन ती गदगसाठी रवाना होईल. गदगला दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी पोहचेल. गाडीच्या देखभालीची जबाबदारी मात्र मुंबई विभागावर सोपवली आहे.