Breaking News

टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करा - डॉ.सुभाष भामरे


धुळे, दि. 07, मे - तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील वाढत्या समस्यांवर मात करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सुचना केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिल्यात.पंचायत समिती कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत डॉ.भामरे बोलत होते. 

डॉ.भामरे म्हणाले की, पाणी टंचाई हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून या कामासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने टंचाईग्रस्त गावातील गावकर्यांना न्याय देण्याचे काम करावे. विविध ग्रामपंचायतींनी सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून आठ दिवसात प्रगती अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

टंचाईग्रस्त गावातील सरपंच, पदाधिकारी व ग्रामसेवकांनी टंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहण करणे, टँकरने पाणी पुरवठा करणे, तात्पुरती पुरक योजना, विंधनविहिर करणे, विहिर खोलीकरणासह आडवे बोअर करणे आदि उपाय योजना प्रस्तावित केल्या तर प्रस्तावित योजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सुचना मंत्री डॉ.भामरे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेला दिल्यात.