Breaking News

डिपीआरचे काम महामेट्रोला देणार


पुणे, दि. 12, मे - पुणे शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज या वाढीव मार्गाच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ( डिपीआर) तयार करण्यात येणार आहे. त्या डीपीआरचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पारेशन यांना 73 लाख रुपयांना देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला आहे. 

शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे कात्रज पर्यत विस्तार क रण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पारेशन या कंपनीला या वाढीव मार्गकेचा डिपीआर तयार करण्याची विनंती केली आहे. त्यावेळी या डिपीआरला लागणार खर्च पालिका करेल असे कळविण्यात आले होते.त्यानुसार महाराष्ट्र रेल कॉर्पारेशन यांनी हे काम प्रगतीपथ्थावर सुरु केले आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत आठ महिने असून त्यासाठी 76 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.